इतिहास लेखनाची शिस्त
[गजानन भास्कर मेहेंदळे यांचा “श्री राजा शिवछत्रपती (पुणे १९९६)” हा ग्रंथ सच्चा साधनांवर आधारित इतिहास लेखनाचा आदर्श व मानदंड म्हणून गौरवला गेला आहे. त्याच्या प्रस्तावनेतील हा काही भाग, विवेकवादी शिस्तीची रूपरेषाच असावा, असा.] शिवचरित्राच्या अभ्यासाची माझी ही वाटचाल चालू असताना सुस्वातीची दोन-तीन वर्षे मी चुकून भलत्याच वाटेला लागलो होतो. मी तेव्हा जी चूक केली तीच …